‘सर’ : ही गोष्ट एका हळुवार नात्याची आहे… ‘सर’वरून ‘अश्विन’पर्यंत जाणाऱ्या रत्नाच्या प्रवासाची आहे!
‘मेड इन मॅनहॅटन’, ‘रोमा’, ‘द मेड’ अशा अनेक सिनेमांमधून घरकाम करणाऱ्या महिलांची गोष्ट दाखवली गेलीय. काहीशी तशीच कहाणी ‘सर’ या सिनेमातही पाहायला मिळते. पोस्टरवर भिंतीच्या अलीकडे आणि पलीकडे असणारे ते दोघं दिसतात. त्यातून त्यांच्यातल्या नात्याच्या बंधाची झलक पाहायला मिळते. या सिनेमाची कथा काही फार ‘आउट ऑफ बॉक्स’ वाटावी अशी नाही, पण तो सरस ठरतो त्यात काम करणाऱ्या कलाकारांच्या अभिनयामुळे.......